महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आर्यन खान तपास प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवले... नवाब मलिक म्हणाले, ही तर फक्त सुरुवात - sameer wankhede removed news

मुंबई - अखेर आर्यन खान प्रकरणातून एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. खंडणीच्या आरोपानंतर तपास काढून घेण्यात आल्याची माहिती आहे.

sameer wankhede
समीर वानखेडे

By

Published : Nov 5, 2021, 7:33 PM IST

Updated : Nov 5, 2021, 8:23 PM IST

मुंबई -अखेर आर्यन खान प्रकरणातून एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. खंडणीच्या आरोपानंतर तपास काढून घेण्यात आल्याची माहिती आहे.

यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी लगेचच ट्विट केले. ते म्हणाले, ही तर फक्त सुरुवात आहे. व्यवस्थेला स्वच्छ करण्यासाठी आणखी काम केले जाईल आणि आम्ही ते करू.

नवाब मलिक यांनी केलेले ट्विट

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करत होते. या प्रकरणासह एकूण सहा प्रकरणांचा तपास दिल्ली एनसीबीची पथके करणार आहेत, अशी माहिती एनसीबीचे उपमहासंचालक (दक्षिण-पश्चिम विभाग) मुथा अशोक जैन यांनी दिली. तसेच हा प्रशासकीय निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करत होते. या तपासादरम्यान, नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले होते. यानंतर ते वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर त्यांना या प्रकरणातून हटवण्यात आले आहे.

अमली पदार्थ प्रकरणांचे स्पेशालिस्ट

समीर वानखेडे एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील प्रादेशिक संचालक आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली होती. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

2004 मधील बॅचचे आयआरएस अधिकारी

समीर वानखेडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून 2004 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. सुरूवातीला त्यांची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. कामातील नैपुण्य बघून त्यांना विभागाने काही प्रकरणांच्या तपासासाठी आंध्र प्रदेश आणि दिल्लीतही पाठविले होते. अमली पदार्थांशी निगडीत बाबींचे तज्ज्ञ म्हणून वानखेडेंची ओळख आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये मुंबईतील एका ड्रग्स प्रकरणाशी निगडीत कारवाईदरम्यान समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर हल्लाही झाल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले होते.

Last Updated : Nov 5, 2021, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details