मुंबईSameer Wankhede Met Sanjay Raut:आज मुंबईतील भांडुपमध्ये एका कार्यक्रमात खासदार संजय राऊत आणि 'एनसीबी'चे माजी संचालक समीर वानखेडे हे एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोघे एकाच व्यासपीठावर होते. कार्यक्रम संपल्यानंतर दोघांमध्ये हस्तांदोलन, चर्चा तसेच विचारपूस झाली. हा कार्यक्रम झाल्यानंतर काही वेळानं समीर वानखेडे यांनी संजय राऊतांच्या भांडुपमधील राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीवरुन बरीच उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण या भेटीचं नेमकं कारण काय, हे अद्याप अस्पष्ट आहे.
समीर वानखेडे राजकारणात येणार? मुंबई 'एनसीबी'चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी नुकतीच वाशिमच्या एका वृत्तपत्रात शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छांची जाहिरात दिली होती. त्यांच्या या जाहिराती नंतर राजकीय वर्तुळात समीर वानखेडे हे राजकारणात येणार आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र आता या चर्चांवर थेट समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.
शिंदे, ठाकरे गटात वादाची ठिणगी:राज्यभर दिवाळी साजरी होत असताना आणि दिवाळीचे फटाके फुटत असताना काल (शनिवारी) मुंब्र्यात ठाकरे गटाची शाखा तोडण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये चांगलीच जुंपली. शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शाखा तोडण्यावरून शिंदे गटावर हल्लाबोल केला.