मुंबई :आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशी करत असतानाच बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी सीबीआयने तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. तसेच समीर वानखेडे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांना 8 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.
न्यायालयातील युक्तिवाद :आज झालेल्या सुनावणीत वानखेडेच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, त्यांनी भ्रष्टाचारा सारखी कृती केलेली नाही. जर आरोपीने चौकशीकरिता सहकार्य केले नाही तर अटक करतात, परंतु समीर वानखेडे हे सहकार्य करत आहेत. त्यामुळे त्यांना अटकेची गरज नाही. तर सीबीआयने त्यांना अटक केली नाही, तर पुरावे नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. अटक केली नाही तर चौकशीवर विपरित परिणाम होईल, असेही सीबीआयने सांगितले.
समीर वानखेडे यांना दिलासा : कर्डिलेया क्रूझवर कथित आर्यन खान ड्रग प्रकरणामध्ये नवीन वळण समोर आलेले आहे. आर्यन खानचे नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकले, असा मोठा दावा त्या संदर्भातील चौकशी अधिकाऱ्याकडून केला गेलेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत समीर वानखेडे यांना दिलासा दिला. मात्र मुंबई उच्च न्यायालयात याबाबत दावा दाखल करावा, असे म्हटले होते. त्यामुळे सुट्टीकालीन न्यायालयात समीर वानखेडे यांनी दावा दाखल होता.