मुंबई -अमली पदार्थ तस्करी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता समीर खान याला 18 जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
करण सजनानी व समीर खान यांच्यामध्ये झालेल्या व्हाट्सअप चॅटमध्ये अमली पदार्थांच्या तस्करी बाबत चर्चा करण्यात आली होती. याबरोबरच समीर खान याच्या बँक अकाउंट मधून करण सजनानी या ब्रिटिश अनिवासी भारतीयाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. मात्र ट्रान्सफर करण्यात आलेले पैसे किती होते याचा खुलासा एनसीबीने केला नाही. समीर खानला अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायद्याने त्याचे काम करावे व सत्य लवकरच समोर येईल, असे म्हणत नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
नवाब मलिकांचा जावई समीर खानला 18 जानेवारी पर्यंत एनसीबी कोठडी - sameer kham latest news
समीर खान याला 18 जानेवारी पर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. समीर खानला अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायद्याने त्याचे काम करावे व सत्य लवकरच समोर येईल, असे म्हणत नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
समीर खानला 18 जानेवारी पर्यंत एनसीबी कोठडी
Last Updated : Jan 14, 2021, 4:11 PM IST