मुंबई -खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मंत्री विनोद तावडेंवर जोरदार निशाणा लगावला आहे. संभाजीराजेंनी आपल्या फेसबुक पेजवरुन एक व्हिडिओ शेअर करत तावडेंना लक्ष केले आहे. विनोद तावडेंनी सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांना ज्या पद्धतीने मदत मागितली त्याचा संभाजीराजेंनी निषेध केला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.
स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही, संभाजीराजेंचा तावडेंवर निशाणा
खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मंत्री विनोद तावडेंवर जोरदार निशाणा लगावला आहे. संभाजीराजेंनी आपल्या फेसबुक पेजवरुन एक व्हिडिओ शेअर करत तावडेंना लक्ष केले आहे.
पूरग्रस्तांची क्रूर चेष्ठा सहन केली जाणार नसल्याचेही संभाजीराजेंनी म्हटले आहे. संभाजीराजेंनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विनोद तावडे हे हातात डबा घेऊन सांगली आणि कोल्हापुरातील पुरग्रस्तांसाठी मदत मागताना दिसत आहेत. रस्त्यावर उतरुन ते माईकवरुन मदतीचे आवाहन करत आहेत. यावर संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला कोणाच्या भिकेची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले संभाजीराजे
@TawdeVinod स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही.