मुंबई - स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले गेले. मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही जागा आहे. त्यामुळे तेथे संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, शिवभक्तांच्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे.
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावं, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - संगमेश्वर हे त्यागाचे प्रतिक न्यूज
स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले गेले. मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही जागा आहे. त्यामुळे तेथे संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे
संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरावस्था दूर करुन तेथे राज्यातील सर्वोत्तम स्मारक तयार करण्याची विनंती संभाजीराजेंनी केली आहे. हा परिसर संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण करुन देतो. ही त्यागाची जागा आहे मात्र, प्रेमयुगुलांनी या ठिकाणाला भोगाची जागा बनवल्याचे संभाजीराजे म्हणाले. तसेच येथील स्मारक स्थळाला पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी, जेनेकरुन गैरकृत्य घडले न पाहिजे असेही संभाजीराजे म्हणाले.