मुंबई: राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी उत्तर दिले. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढेच नव्हे तर संभाजीराजे यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत. काहीच ठेवायचे नाही असा निर्णयच सरकारने घेतला असून या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या होत्या. आझाद मैदानावर छत्रपती संभाजी राजेंनी अमरण उपोषण सुरू केले. त्यानंत मराठा आरक्षण प्रश्नावर या हालचाली सुरू झाल्या होत्या. मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे, ते देखील महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी राजे यांची प्रकृतीदेखील महत्त्वाची आहे. त्यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये सर्व मुद्दे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांना सांगण्यात येती अशी प्रतिक्रियां वळसे पाटील यांनी दिली होती. हे आंदोलन लवकरात लवकर संपुष्टात आले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचही ते म्हणाले होते.ळसे-पाटील यांनी आज भेट देऊन संभाजीराजे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आणि उपोषण संपुष्टात आणण्याची मागणी संभाजीराजे यांच्याकडे केली. मात्र, राजे यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला आहे.
सरकारवर व्यक्त केली होती नाराजी
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावरून मुंबईतील आजाद मैदान ( Aazad Maidan Mumbai ) येथे आमरण उपोषणाला सुरुवात ( Chhatrapati Sambhajirajes Fast Till Death ) केल्यावर 17 जूनला राज्य सरकार सोबत चर्चा केली होती. पंधरा दिवसात राज्य सरकार कडील सर्व मागण्या मार्गी लावू असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र अद्यापही त्याच मागण्या घेऊन उपोषणाला बसावे लागत आहे अशी खंत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती.