मुंबई - नामदेव ढसाळ यांच्या कवित्व प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी 'सर्व काही समष्टीसाठी 2019' या चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील मराठी भाषा भवन येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये वेगवेगळे चित्र प्रदर्शन, पेंटिंग्ज, लघुपट, नाटक, विविध प्रकारच्या कला कविता सादर करण्यात येणार आहेत.
नामदेव ढसाळ यांना अभिवादन करण्यासाठी कलाकारांची मांदियाळी - poem
नामदेव ढसाळ यांच्या कवित्व प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी 'सर्व काही समष्टीसाठी 2019' या चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील मराठी भाषा भवन येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
'सर्व काही समष्टीसाठी' या कार्यक्रमाचे आज ५ व्या वर्षात पदार्पण झाले. रविवारी सायंकाळी पेरीअरुम पेरुलम या चित्रपटाची निर्मिती करून सिनेमात प्रदर्शन करणारे मारी सेलवन यांना २०१९ चा समष्टी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच महिला पत्रकार सुकन्या शांता यांना गोलपीठा हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात २ दिवसात ५२ वेगवेगळे विभाग ठेवण्यात आले आहेत. १४२ कलावंत एकत्र काम करणार आहेत. हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय किर्तीवर गाजलेले आंबेडकरी चळवळीतले सर्व कलावंत आहेत ते त्यांचे चित्र प्रदर्शन कला, नाटक कविता, कथा यात सादर करण्यात येणार आहे. सुकन्या शांता या पत्रकारितेच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हक्काचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्यामुळे मागासवर्गीय महिलांच्या केसेस मीडियामध्ये वर येतात त्या लावून धरतात त्यांच्या या योगदानासाठी गोलपीठा पुरस्कार प्रदान करत आहोत. या कलावंतांना मुंबई महानगरांमध्ये हक्काचा नसलेला स्तंभ मागासवर्गीय कलाकारांसाठी उभा केलेला आहे, असे संयोजक वैभव छाया यांनी सांगितले.