मुंबई -जुने-जाणते नेते अपयशी ठरत असताना नव्या नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असते. मात्र, काँग्रेस जुन्यांच्या कोंडाळ्यात अडकली आहे. त्यामुळे नव्यांची घुसमट होत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेने मुखपत्र सामनातून दिली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपने संपूर्ण ताकदीने पराभूत केले, आज त्याच भाजपने वाजत गाजत त्यांचे स्वागत केले. मध्य प्रदेशातील ही 'उलटी वरात' भाजपला बुटकुळ्या फुगवणारी वाटत असली तरी कमलनाथ हेसुद्धा कसलेले राजकाराणी असल्याचे सेनेने म्हटले आहे. तसेचे तेथे घडलेल्या घडामोडींवरून राज्यातील कमळपंथीयांनी स्वप्न पाहू नयेत, असा टोलाही सेनेने भाजपला लगावला.
...तर अशी वेळ आली नसती
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांना अडगळीत टाकणे, हे काँग्रेसला महागात पडले आहे. या असंतोषाच्या ठिणग्या गेल्या दिवसांपासून पडत होत्या. त्याची दखल काँग्रेस नेतृत्वाने घेतली नाही. काठावर असलेले बहुमत आपण रेठून नेऊ, या भ्रमात कांग्रेस राहिल्याचे सेनेने म्हटले आहे. सिंधिया हे प्रदेशचे अध्यक्षपद मागत होते, त्यानंतर राज्यसभेची उमेदवारी मागितली अशी चर्चा आहे, यापैकी एखादी त्यांची मागणी पूर्ण केली असती तर तेलही गेलदेखील गेलं अशी अवस्था काँग्रेसवर आली नसती असे सेनेने म्हटले आहे.