महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात सलून, केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी - ब्युटी पार्लर्स

राज्यात कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात केशकर्तनालये, सलून्स आणि ब्युटी पार्लर्स २८ जूनपासून सुरू करता येतील. या दुकांनासाठी राज्य शासनाने सुधारीत अधिसूचना जारी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Jun 26, 2020, 6:17 AM IST

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याप्रमाणे शासनाने आज 'मिशन बिगिन अगेन'च्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात केशकर्तनालये, सलून्स आणि ब्युटी पार्लर्स २८ जूनपासून सुरू करता येतील. मात्र, या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लागेल. या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणे आवश्यक आहे.

· केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग या मर्यादीत सेवा ग्राहकांना देता येतील. त्वचेशी संबंधीत इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल.
· दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.
· ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइझ करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर २ तासांनी सॅनिटाइझ करणे गरजेचे आहे.
· फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही, अशी वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइझ करावी लागेल.
· उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी.

राज्यातील उर्वरित भागांमध्ये केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सुध्दा उपरोक्त नमूद सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details