मुंबई- कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका हातावर पोट असलेल्या नाभिक समाजावरही झाला आहे. राज्यातील ७० टक्के नाभिक हे कर्ज काढून भाड्याच्या दुकानात व्यवसाय करतात. त्यामुळे, केंद्र सरकारने आणि अर्थमंत्रालयाने आमच्यासाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी नाभिक समाज संघटनेने केली आहे.
नाभिकांना तात्काळ २ ते ५ हजार रुपयांची मदत सरकारने करावी, अशी इच्छा राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्ता अनारसे यांनी केली आहे. तसे पत्र संघटनेच्या वतीने केंद्र सरकार व मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्यात आले आहे. २६ मार्च रोजी केंद्रीय मंत्र्यांनी कामगारांच्या खात्यात २ हजार रुपये सहायता निधी जमा होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, ही रक्कम आजपर्यंत जमा करण्यात आलेली नाही.