मुंबई :पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी हे प्रकरण 2019 मधील आहे. सलमान खान जेव्हा रस्त्यावर दिसला, तेव्हा काही पत्रकारांनी सलमान खानचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. सेलिब्रिटी असल्याने स्वाभाविक पत्रकारांनी कॅमेरा काढून काही फोटो काढले. तेव्हा सायकल चालवत असलेल्या सलमान खानने पत्रकाराकडील कॅमेरा हिसकवला. तसेच पत्रकारांसोबत गैरवर्तन देखील केले, असा आरोप ठेवत पत्रकाराने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणात केवळ सलमान नव्हे तर त्याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख याचेही नाव घेतले गेले होते. त्यामुळे दोघेही कायदेशीर अडचणीत सापडले आहेत.
गैरवर्तन केले, असभ्य भाषेमध्ये बोलणे :अंधेरी न्यायालयाने सलमान खानला या प्रकरणांमध्ये तक्रारदाराच्या याचिकेनुसार समन्स बजावले होते. त्याबाबत सलमान खानने उच्च न्यायालयामध्ये त्या समन्स विरोधात धाव घेतली आहे. त्यामुळे आता 30 मार्च रोजी या प्रकरणात काय निर्णय होतो ते पहावे लागेल. सलमान खानने त्या पत्रकाराला धमकी देखील दिली होती, असभ्य भाषेत बोलला होता, असा देखील आरोप करीत पत्रकाराने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. सलमान खानसारख्या सेलिब्रिटीकडून ही अपेक्षा नव्हती. त्याचे कारण सेलिब्रिटींना जनता आणि मीडिया जेव्हा भेटते, त्यावेळेला त्याच्यासोबत संवाद करत असते. मात्र सलमान खानने याबाबत फोटो काढला असता कॅमेरा काढून घेतला. गैरवर्तन केले, असभ्य भाषेमध्ये बोलणे केले, असे याचिककर्ताने म्हटले आहे.