मतदारांसाठी सखी मतदान केंद्र ठरले आकर्षण - Sakhi polling station
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंधेरी पूर्व परिसरातील मरोळ मरोशी मार्गावर असणाऱ्या मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथे असणारे मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून स्थापन करण्यात आले आहे. (Sakhi polling station became an attraction) महिला मतदार जास्त असल्याकारणाने हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गुलाबी रंगाने ते सजवण्यात आले आहे.
मुंबई:भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) मार्गदर्शक सूचनानुसार अंधेरी पूर्व परिसरातील मरोळ मरोशी मार्गावर असणाऱ्या मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथे असणारे मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून स्थापन करण्यात आले आहे. (Sakhi polling station became an attraction) या मतदान केंद्रावर एकूण १४१८ मतदार असून त्यापैकी ७२६ मतदार महिला आहेत तर ६९२ मतदार पुरुष आहेत. महिला मतदार जास्त असल्याकारणाने हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गुलाबी रंगाने ते सजवण्यात आले आहे.