पिंपरी-चिंचवड(पुणे) - देहू नगरीत जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थित उत्साहात पार पडला. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करत तुकोबांचा बीज सोहळा हरिनामाचा गरज करत पार पडला आहे. इतर व्यक्तींना देहूत प्रवेश नसल्याने देहूच्या वेशीवर नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच, देहूगावात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
मुख्य मंदिरातून पालखीचे प्रस्थान -
देहूत मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थित पार पडला संत तुकाराम बीज सोहळा - dehu letest news
देहूच्या मुख्य मंदिरात पंचपदी झाल्यानंतर जगतगुरु संत तुकाराम महाराज पादुका पालखी वैकुंठस्थान येथे प्रस्थान केले. तिथे, नादुरकी वृक्षाखाली अर्धा ते पाऊण तास कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कीर्तन संपताच वृक्षावर वारकऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत सोहळा संपन्न झाला. दरवर्षी याच नादुरकी वृक्षाखाली आणि मंदिराच्या परिसरात वाकऱ्यांना बसण्यास जागा पुरत नसते. देहू नगरी वारकऱ्यांनी फुलून जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

देहूत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील किंवा शहरातील नागरिकांनी देहूत येऊ नये यासाठी वेशीवर नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, बीज सोहळ्यात महिलांचा देखील सहभाग पाहायला मिळाला. फुगड्या खेळत त्यांनी सोहळ्याचा आनंद घेतला.
हेही वाचा -तलवारी घेऊन हजारो शीख पोलिसांवर धावले, बघा नांदेडचा थरारक VIDEO