मुंबई - कोरोना विषाणूच्या भीतीने गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे घरीच असलेल्या सैफ अली खान व करीना कपूरने मुलगा तैमूरसोबत रविवारी मरीन ड्राइव्हवर फेरफटका मारला. ते समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्ताचा आनंद घेत असताना, पोलिसांनी त्यांना हटकले. तेव्हा त्यांना घरी परतावे लागले.
दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर केंद्र सरकारने अनलॉक-१ ची घोषणा केली आहे. अनलॉक-१ मध्ये मॉर्निंग वॉक करण्यास, घराबाहेर फिरण्यास परवानगी आहे. यामुळे दोन महिने घरी बसून कंटाळलेले सैफ अली खान आणि करीना कपूर मुलगा तैमूरसह फेरफटका मारण्यासाठी मरीन ड्राइव्हला पोहोचले. तेव्हा तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी सैफ-करीनाला हटकले. याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये सैफ तिची पत्नी करीना आणि मुलगा तैमूरसमवेत बर्याच दिवसानंतर समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. यावेळी तैमूर सैफच्या खांद्यावर बसला आहे. सैफ आणि करीना मरीन ड्राईव्हवरील स्लॅबवर उभे आहेत आणि ते समुद्रावरून येणाऱ्या लाटांचा आनंद घेत आहेत. यादरम्यान, व्हिडिओमध्ये पाठीमागून पोलिसांचा आवाज ऐकू येत आहे. पोलीस अधिकारी त्यांना सांगत आहेत की, लहान मुलांना बाहेर घेऊन येण्यास परवानगी नाही. पोलिसांचे हे बोलणे ऐकल्यानंतर सैफ अली खान देखील यावर प्रतिक्रिया देताना दिसला. त्यानंतर काही क्षणात, सैफ आणि करीना मुलासह घराकडे परतले.