मुंबई -जगभर हातपाय पसरवणाऱ्या कोरोना विषाणूमुळे गेल्या एका वर्षांपासून संपूर्ण विश्वात हाहाकार माजवलेला आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात देहविक्री करणाऱ्या व्यवसायावर परिणाम झाला असून 25 हजार महिलांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, त्यांच्या मदतीसाठी साई संस्था धावून आली असून गेल्या 211 दिवसांपासून अन्न वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे.
देहविक्री करणाऱ्या महिलांवर संकट -
देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे देहविक्री करणाऱ्या महिलांच्या व्यवसाय ठप्प आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सुद्धा, भीतीमुळे ग्राहक येत नव्हते. त्यातच आता पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात 25 हजार देहविक्री करणाऱ्या महिलांचे कुटुंब राहत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबियांना जगवायचे कसे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. मात्र, मुंबईच्या सामाजिक संस्था साईने पुढाकार घेऊन देहविक्री करणाऱ्या महिलांची आणि त्यांच्या कुटुंबियांची जेवणाची सोय केली आहे. गेल्या वर्षी सुद्धा या साई संस्थेकडून तब्बल 200 दिवस जेवण वितरित केले होते. आता पुन्हा या मोहिमेची सुरूवात केली असल्याची माहिती, सोशल अँक्टिव्हिटीज इंटिग्रेशन संस्थेचे संस्थापक विनय वस्त यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहेत.
दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावेत -