महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सही है नोटबंदी, ऐन निवडणुकांच्या काळात प्रदर्शित होणार नोटबंदीचं गुणगान गाणारा चित्रपट - PM Modi

या चित्रपटात नोट बंदीच्या दरम्यान झालेल्या चांगल्या वाईट घटनांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

नोटबंदीचं गुणगान गाणारा चित्रपट

By

Published : Apr 17, 2019, 12:35 PM IST

मुंबई- निवडणूकीच्या तोंडावर पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी निर्णयामुळे प्रेरित होऊन मुस्कान प्रॉडक्शन आणि दिग्दर्शक बाळासाहेब गोरे यांनी सही हैं नोटबंदी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात नोट बंदीच्या दरम्यान झालेल्या चांगल्या वाईट घटनांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

नोटबंदीचं गुणगान गाणारा चित्रपट

येत्या १९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, असे बाळासाहेब गोरे यांनी आज मुंबईत मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेत सांगितले. निवडणुकीच्या काळात प्रचाराला बंदी असताना अप्रत्यक्षपणे भाजप कोणत्या ना कोणत्या मार्गे आपला प्रचार करताना दिसत आहे. त्यातीलच एक हा चित्रपट आहे, या चित्रपटाच्या पोस्टरवर पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावला असून यावर काही पक्षांनी आक्षेप घेतला आहे. आता या चित्रपटाला निवडणूक आयोग काय निर्बंध लावते, हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details