मुंबई - सीवरेज लाईनची सफाई करताना सफाई बरेचदा कामगारांचा गुदमरून मृत्यू होतो. तर, अशा सीवरेज लाईनची सफाई करताना देशभरात 820 सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मनहर झाला यांनी दिली.
देशभरात 820 सफाई कामगारांचा मृत्यू - राष्ट्र्रीय सफाई आयोगाची माहिती - Brihanmumbai Municipal Corporation
सीवरेज लाईनची सफाई करताना सफाई बरेचदा कामगारांचा गुदमरून मृत्यू होतो. तर, अशा सीवरेज लाईनची सफाई करताना देशभरात 820 सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मनहर झाला यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगारांच्या समस्यांबाबत बुधवारी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत आयोगाचे दिलीप हाथीबेड, महेंद्र प्रसाद, पूर्ण सिंग, मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, प्रवीण दराडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना, आतापर्यंत सीवरेज लाईनमध्ये पडून 820 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, असून त्यापैकी 600 कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती झाला यांनी दिली.
नालासोपारा येथे एका खासगी वसाहतीमध्ये सीवरेज लाईनच्या सेफ्टीक टँकमध्ये उतरलेल्या तीन सफाई कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल सफाई आयोगाने घेतली आहे. हे सफाई कामगार स्थानिक स्वराज्य संस्थेचे नव्हते. त्यांना संबंधित वसाहतीमधील नागरिकांकडून सेफ्टीक टँक साफ करायला बोलावण्यात आले होते. मृत झालेल्या कर्मचाऱयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या वारसांना नोकरी देण्यात आल्याची माहिती सफाई आयोगाचे दिलीप हाथीबेड यांनी दिली.