मुंबई - मालेगाव बॉम्ब स्फोटासंदर्भात न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना न्यायालयाने हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी मुंबईतील विशेष न्यायालयात साध्वी प्रज्ञा सिंह सुनावणीसाठी हजर झाल्या. यावेळी त्यांनी न्यायालयात बॉम्ब स्फोटासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नसल्याचे उत्तर दिले आहे.
मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात आपणास काही माहिती होती का? असा प्रश्न न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना विचारला. यावर 'मला याबद्दल काहीही माहीत नाही, असे उत्तर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दिले आहे. तर याच प्रकरणातील दुसरा आरोपी समीर कुलकर्णी याने न्यायालयाच्या याच प्रश्नावर याबद्दल मला माहिती आहे आणि हे वास्तव असून सत्य आहे, असे उत्तर दिले.