मुंबई- भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याकारणाने त्यांना मध्यप्रदेशातून एअर ॲम्बुलन्सद्वारे मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात उपचाराचसाठी दाखल करण्यात आले आहे. साध्वी प्रज्ञासिंग यांना यापूर्वीदेखील दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळेसही त्यांना श्वसनाचा आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडलेली आहे.
भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांची प्रकृती बिघडली; मुंबईच्या कोकिळाबेन रुगणालयात दाखल - भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग न्यूज
साध्वी प्रज्ञासिंग यांना यापूर्वीदेखील दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळेसही त्यांना श्वसनाचा आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडलेली आहे.
गोडसेंविषयींच्या वक्तव्यावरून वाद
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गंभीर आरोप झाले. या प्रकरणात प्रज्ञासिंह ठाकूर दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून जामिनावर आहेत. मुंबईच्या उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी अद्याप संपलेली नाही. जामिनावर असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी भोपाळ मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव केला. खासदार झाल्यानंतर एकदा महात्मा गांधींवर गोळ्या झाडणाऱ्या गोडसेंविषयी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एक वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे काही काळ वाद निर्माण झाला होता. साध्वी प्रज्ञासिंग यांना तीन वर्षापूर्वी कॅन्सर आजार झाला होता.
हेमंत करकरेंबाबतच्या विधानावरून टीका
प्रज्ञासिंह यांना जेव्हा भाजपच्या खासदारकीचे तिकीट मिळाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रज्ञासिंह मुंबई बॉम्बस्फोटमध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत एक विवादास्पद भाष्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर सर्व समाज माध्यमातून टीका करण्यात आली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपले विवादास्पद भाष्य मागे घेत माफीसुद्धा मागितली होती.