महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सचिन वाझेचे हॉटेलमधील 13 लाखाचे बिल सोन्याच्या व्यापाऱ्याने भरल्याचे उघड - सचिन वाझेचे बिल सोन्याच्या व्यापाऱ्याने भरले

मुंबईतील ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझे हा काही दिवसांसाठी वास्तव्यास होता. त्याचे संपूर्ण बिल मुंबईतील एक सोन्याच्या व्यापाऱ्याने भरले असल्याचे तपासात समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या संदर्भात मनीष छाचड या व्यापाऱ्याची चौकशी केली आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Mar 24, 2021, 3:59 PM IST

मुंबई- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असेलल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या तपासातून आता नव-नवीन खुलासे समोर येत आहेत. मुंबईतील ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझे हा काही दिवसांसाठी वास्तव्यास होता. त्याचे संपूर्ण बिल मुंबईतील एक सोन्याच्या व्यापाऱ्याने भरले असल्याचे तपासात समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या संदर्भात मनीष छाचड या व्यापाऱ्याची चौकशी केली आहे.

ट्रायडेंट हॉटेलमध्ये सचिन वाझे हा सुशांत सदाशिव खामकर या नावाच्या बनावट आधार कार्डच्या एका अलिशान खोलीमध्ये राहत होता. या बनावट आधार कार्डचा नंबर 72825 2857 6822 असा आहे. हॉटेलमध्ये सापडलेल्या सीसीटीव्ही दृष्यांमध्ये सचिन वाझे हॉटेलमध्ये आला होता, त्यावेळी त्याच्यासोबत 4 बॅग होत्या. या बरोबरच वाझे या व्यक्तीच्या मागे एक महिला नोट मोजण्याच्या मशीनसोबत येत असल्याचे दिसून आले आहे. जवळपास 13 लाखांचे बिल मनीष छाचड या सोने व्यापाऱ्याने भरले असून ते एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून भरले असल्याचे समोर येत आहे. या बरोबरच सीसीटीव्हीमधील ही अज्ञात महिला गुजरातमधील असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, सचिन वाझेच्या डायरीत सांकेतिक भाषेमध्ये काही रक्कमेचा उल्लेख आढळून आला असून या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करीत आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री, गृहमंत्री अन् परमबीर सिंग यांच्या चौकशीसाठीच्या याचिकेवर होणार 30 मार्चला सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details