मुंबई -शंभर कोटी वसुली प्रकरणात आज अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्या वकिलाकडून चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझे ( Sachin Waze ) यांची उलट तपासणी करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांनी आज (दि. 30) चांदिवाल आयोगासमोर ( Chandiwal Commission ) सचिन वाझेची उलट तपासणी ( Cross-Examination of Sachin Waze ) करण्यात यावी, यासाठी वकीलाच्या मार्फत अर्ज केला होता. या अर्जाला आयोगाने परवानगी देत आज सचिन वाझेची उलट तपासणी करण्यात आली आहे.
चांदिवाल आयोगासमोर आतापर्यंत सचिन वाझे यांची संजय पालांडे यांचे वकील शेखर जगताप यांनीही उलटतपासणी केली आहे. आज अनिल देशमुख यांच्या वकीलामार्फत उलट तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर आयोगाचे कामकाज उद्या (दि. 1 डिसेंबर) सकाळी 10.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. उद्या पुन्हा सचिन वाझे यांची उलट तपासणी करण्यात येणार आहे.
अनिल देशमुख यांचे वकील अनिता कँस्टेलिनो यांनी सचिन वाझे यांच्याशी केलेली प्रश्नोत्तरे
प्रश्न - 13 मार्चला तुम्हाला एनआयएने अटक केली होती..?
उत्तर- हो, मला एनआयएने अटक केली होती.
प्रश्न- तुम्हच्यावर एनआयएमध्ये असताना दबाव होता..?