मुंबई :100 कोटी भ्रष्टाचार प्रकरणाची आरोपी सचिन वाझेला आज न्यायालयात हजर थोड्या वेळात होणार सुनावणी होणार आहे. इतरांप्रमाणे मला देखील जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. सचिन वाझे सध्या तळोजा तुरुंगातुन मुंबई सत्र न्यायालयात आणले. याधी माजी मंत्री अनिल देशमुख याची झाली जामिनावर सुटका झाली आहे. इतरांना जसा जामीन मिळाला तसाच मला देखील जामीन मिळावा यासाठी जामीन अर्जाबाबत आज सचिन माझे यांना हजर केले होते.
सचिन वाझे सुटकेसाठी याचिका : सचिन वाझे याने जी सुटकेसाठी याचिका केलेली आहे. त्या याचिकेच्या विरोधात सीबीआयने आपल्या उत्तरात न्यायालयासमोर म्हणणे मांडले आहे की, "सचिन वाझे याला जामीन पाहिजे आहे, मात्र ती याचिका न्यायालयासमोर ठेवणे उचित नाही. सचिन वाझे याच्या अर्जानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता आधारे गेल्यावर्षी जूनमध्ये त्याचा जामीन अर्ज फेटाळला गेलेला आहे. त्यामुळे त्याच्या आधारावरच न्यायालयाने विचार करावा. तसेच सीबीआयने हे देखील नमूद केलेले आहे, की जर न्यायालयाला त्याच्या अर्जावर कायद्यानुसार जो काही योग्य वाटेल असा आदेश पारित करावा. तो सीबीआयला मान्य असेल.
माझ्या अर्जाचा विचार व्हावा :सचिन वाजे सध्या तळोजा तुरुंगामध्ये आहे. तुरुंगातूनच सचिन वाझे याने लेखी अर्ज न्यायालयामध्ये पाठवला आहे. या याचिकेमध्ये सचिन वाझेंने नमूद केलेले आहे की,"या प्रकरणामध्ये तपास सुरू झाला. तसेच खटला पूर्ण होईपर्यंत जो साक्ष देण्यासाठी व्यक्ती आहे. त्याला खटला चालू असेपर्यंत तुरुंगात का ठेवावे. जर मला साक्ष देण्यासंदर्भात जर अटक केली आहे; तर साक्ष दिल्यानंतर मला सुटका मिळायला हवी. त्यासाठी माझ्या अर्जाचा विचार व्हावा;" असे देखील सचिन वाजेने आपल्या अर्जात म्हटलेलं आहे .