महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Antilia Explosive Case एनआयएकडून तपासात जप्त केलेले कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक पुरावे द्या: सचिन वाझेचा न्यायालयात अर्ज

मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी (Industrialist Mukesh Ambani ) यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांनी ( Antilia Explosive Case ) देशभर खळबळ उडाली होती. त्यानंतर या गाडीचा मालक असलेल्या मनसूख हिरेन खून ( Mansukh Hiren murder case ) प्रकरणाने नागरिकांना धक्काच बसाला. अधिवेशन सुरू असल्याने हे प्रकरण ( Proof Seized By NIA ) चांगलेच चिघळले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सचिन वाझे ( Sachin Vaze Demands Documents And Electronic Proof ) करत होते होता. मात्र एनआयएकडे तपास गेल्यानंतर सचिन वाझे हाच आरोपी असल्याचे एनआयएने दावा केला.

Sachin Vaze Demands Documents And Electronic Proof
आरोपी सचिन वाझे

By

Published : Jan 10, 2023, 6:57 PM IST

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्फोटक ( Antilia Explosive Case ) तथा मनसुख हिरेन खून प्रकरणात सचिन वाझे हा आरोपी आहे. सचिन वाझेने ( Proof Seized By NIA ) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात NIA ने तपासादरम्यान जप्त केलेले कागदपत्र तथा इलेक्ट्रॉनिक पुरावे ( Sachin Vaze Demands Documents And Electronic Proof ) देण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर एनआयएला उत्तर दाखल करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.

एनआयएला उत्तर दाखल करण्याचे निर्देशआरोपी सचिन वाझे यांनी आपल्या अर्जात एनआयएने NIA तपासात जप्त केलेल्या सर्व पुराव्यांची माहिती देण्यात यावी यासाठी अर्ज केला आहे. NIA तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेली कागदपत्रांची पुरावा एक्झिबीटमध्ये नोंद नाही. हे कागदपत्रांच्याही प्रति देण्याची मागणी सचिन वाझेने केली आहे. ही मागणीचा अर्ज कोर्टाने स्वीकारी, मात्र यावर कोणताच निर्णय अद्याप दिलेला नाही. तसेच या अर्जावर एनआयएला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

आरोपपत्राच्या प्रती देण्यासाठी 40 लाख रुपयांचा खर्चया प्रकरणातील सर्व आरोपींना आरोपपत्राच्या प्रती देण्यासाठी 40 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे एनआयएने न्यायालयात यापूर्वी अर्जाद्वारे स्पष्ट केले होते. हा खर्च परवडणारा नसल्याचे एनआयएतर्फे विशेष न्यालयाला सांगण्यात आले आहे. शिवाय या प्रती आरोपींना उपलब्ध करण्यासाठी 258 दिवस म्हणजेच 8 महिने किंवा त्याहून अधिकचा वेळ लागेल असा दावा एनआयएने केला आहे. पुराव्यात मोठय़ा प्रमाणात डिजिटल पुराव्याचा समावेश असून त्यात मुंबई आणि ठाणे येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केलेले चित्रिकरणही आहे. तसेच दूरध्वनी नोंदी आणि त्यांच्या संभाषणाच्या लाखो प्रतींचाही समावेश असल्याचा दावा एनआयएने केला आहे. या प्रकरणात १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कठोर अशा बेकायदा कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (यूएपीए) कलमे लावण्यात आली आहेत.

प्रदीप शर्मासह दहा जणांविरोधात आरोपपत्रराष्ट्रीय तपास पथकाने विशेष न्यायालयात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मासह ( Encounter Specialist Pradip Sharma ) दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रांमध्ये दोनशे साक्षीदारांची यादी असून १६४ साक्षीदारांचा जबाब दंडाधिकारी न्यायालयात नोंदवलेला आहे. कोरोनामुळे एनआयएने आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांचा जादा अवधी न्यायालयात मागितला होता. ही मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी न्यायालयात एनआयएने सुमारे 10 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. वाझेसह नरेश गोर, विनायक शिंदे, रियाझ काझी, सुनील माने, संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोतकरी, मनीष सोनी, आणि प्रदीप शर्मा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणात तीन एफआयआर दाखल असून स्कॉर्पियो स्फोटक प्रकरण, स्कॉर्पियो गाडी चोरी आणि मनसुख हिरेन खून ( Mansukh Hiren murder case ) याबाबतचे आरोप आहेत. एनआयएने हत्या, कटकारस्थान, अपहरण, धमकी देणे, सामाजिक शांतता भंग करणे, इ. भादंवि कलम 120 ब, 201, 286, 302, 364, 384, 386, 403, 419, 506 इ. यूएपीए अंतर्गत कलम 16, 18, 20 आणि हत्यारे आणि स्फोटके कायद्यानुसार आरोप दाखल केले आहेत.

तपास अधिकारी ते आरोपीमागील वर्षी 2021 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पियो गाडीत जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र मिळाले होते. या गाडीचा ताबा ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्याकडे होता. मात्र मार्चमध्ये त्यांचाही मृतदेह ठाणे खाडीत आढळला होता. प्रारंभी वाझे मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करीत होता. मात्र एनआयएने तपास सुरू केला आणि या प्रकरणात वाझेलाच प्रमुख आरोपी केले. तसेच पोलीस दलातील अन्य काही जणांसह दहा आरोपी यामध्ये अटकेत आहेत. शर्माला देखील एनआयएने अटक केली असून सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

काय आहे प्रकरणउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटके सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथके घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती, त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळले.

ABOUT THE AUTHOR

...view details