मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 'वडापाव'वर असलेले प्रेम सर्वांनाच माहिती आहे. यासंबंधी त्याने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो वडापाव बनवताना दिसत आहे. तसेचल यावेळी अपेक्षित नसलेले पाहुणेही दाखल झाले आहेत, ते म्हणजे मांजर.
सचिन तेंडुलकरने बनवलाय वडापाव, शेअर केले फोटो - सचिन तेंडुलकर वडापाव फोटो
सचिन लॉकडाऊन काळात आपले आवडते खाद्यपदार्थ बनविताना दिसला. याबाबत त्याने वेळोवेळी फोटो देखील शेअर केले. त्याच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक गोड पदार्थ बनवून आपल्या कुटुंबाला सरप्राईज दिले होते.
सचिनने फोटो शेअर करत लिहिलेय की, वडापाव माझा नेहमीच आवडता पदार्थ आहे. यावेळी अनपेक्षित पाहुणे देखील आले होते, जे वडापावकडे अतिशय उत्सुकतेने पाहत होते. यावर 'माझ्यासाठीही एक वडापाव बनव', असं म्हणत हरभजन सिंगने टिपण्णी केली.
सचिन लॉकडाऊन काळात आपले आवडते खाद्यपदार्थ बनविताना दिसला. याबाबत त्याने वेळोवेळी फोटो देखील शेअर केले. त्याच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक गोड पदार्थ बनवून आपल्या कुटुंबाला सरप्राईज दिले होते. यावेळी त्याने स्वतः 'मँगो कुल्फी' बनवली होती.