मुंबई- अंबानी यांच्या घराबाहरील स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासात एनआयने तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. त्यानंतर तपासादरम्यान ‘एनआयए’च्या पथकाने मंगळवारी रात्री एक मर्सिडीज जप्त केली. मात्र, मनसुख हिरेन यांनी १७ फेब्रुवारीला वापरेलेल्या त्याच मर्सिडीज कारसोबत(एमएच १८-बी आर-९०९५) ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके यांचा फोटो समोर आला आहे. या संदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांकडून खुलासा मागितला आहे.
ठाणे जिल्हा ग्रामीणचे भाजप युवा मोर्चाचे सचिव-
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी NIA ने ताब्यात घेतलेल्या मर्सिडीज बेंझसोबत ठाणे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे फोटो काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत, भाजपाला याबाबतही स्पष्टीकरण देणार का? असा सवाल केला आहे. देवेने हेमंत शेळके असे त्या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शेळके हे ठाणे जिल्हा ग्रामीणचे भाजप युवा मोर्चाचे सचिव असल्याचेही एक नियुक्ती पत्रही सावंत यांनी ट्विट केले आहे. सचिन वाझे या गाडीचा वापर करीत होते, अशी माहिती एनआयएचे विशेष महानिरीक्षक अनिल शुक्ला यांनी दिली होती.