महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सणासुदीच्या दिवसात मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे पालिका आयुक्तांचे आश्वासन - सचिन सावंत - mumbai water supply news

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.

सचिन सावंत
सचिन सावंत

By

Published : Aug 16, 2020, 6:50 PM IST

मुंबई - सध्या सणासुदीचे दिवस असून घरोघरी गणेशोत्सवाची तयारीही सुरु आहे. या काळात पाणी कपात केल्याने सामान्य मुंबईकरांच्या त्रासात भर पडली आहे. त्यामुळे पाणी कपातीच्या निर्णयाचा पूनर्विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती सचिन सावंत यांनी दिली.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, ‘मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने मुंबई महानगर पालिकेला ५ ऑगस्ट पासून २० टक्के पाणी कपात करावी लागली आहे. परंतु सध्या मुंबईत गणेशोत्सवाची तयारी केली जात आहे. लॉकडाऊन असल्यामुळे बहुसंख्य महिला घरातच काम करत आहेत. अशा स्थितीत पाणी कपात ही त्रासदायकच आहे. सणासुदीचा विचार करुन पाणी कपातीचा हा निर्णय रद्द करावा व पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी विनंती पालिका आयुक्तांना केली असता त्यांनी तात्काळ दखल घेत पाणी पुरवठा लवकरच सुरुळीत करण्याचे आश्वासन दिलेले आहे.’

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणात आज १० लाख ९९ हजार ४४५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला असून धरणांतील पाणीसाठा ७५.९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून दरदिवशी ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details