महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बिहार समर्थक महाराष्ट्र भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो'

बिहार पोलिसांचे समर्थन करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीटेच सरचिटणी आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

sachin sawant
sachin sawant

By

Published : Aug 16, 2020, 6:51 PM IST

मुंबई - केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना यावर्षी एकही पदक मिळालेले नाही. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल 58 पदक मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान गाणाऱ्या आणि महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक भाजप नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सावंत पुढे म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्याचा कृतघ्नपणा महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी वारंवार केला आहे. मुंबई पोलीस सुशांतसिंह प्रकरणाचा तपास उत्तमरित्या करत असताना त्यांच्या तपासावर संशय घेणे, तपास सीबीआयला देण्याची मागणी करणे, तसेच पोलीस महासंचालकांना रजेवर पाठवण्याची मागणी करणे, अशा पद्धतीने सातत्याने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवून एकप्रकारे त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम या मंडळींनी केले आहे आणि आजही करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबई व महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांना पदक देऊन त्यांचा सन्मान करुन त्यांच्या कामावर विश्वास असल्याचेही दाखवून दिले आहे ही राज्यातील भाजप नेत्यांचा मोठी चपराक आहे.

मुंबई पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवत बिहार पोलिसांचा मात्र या लोकांना चांगलाच पुळका आलेला दिसत आहे. बिहार पोलिसांना सुशांतसिंह प्रकरणाचा तपास करु द्या, त्यांच्या अधिकऱ्यांना क्वारंटाईन करणे अयोग्य आहे असे गळे काढण्यात आले. बिहार पोलीस मुंबईत येऊन आणि बिहारचे डीजीपी माध्यमातून जाहीरपणे मुंबई पोलीसांचा अवमान करत होते त्यावेळी महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांना आनंद होत होता.

वास्तविक पाहता मुंबई पोलीस दल हे जगातील उत्तम पोलीस दलांपैकी एक आहे. याच मुंबई पोलिसांनी आतापर्यंत कठिणातील कठीण गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल, असे उत्तम काम केलेले आहे. मागील पाच वर्षे याच पोलीस दलाचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून काम पाहिले आणि सत्ता जाताच सहा-सात महिन्यात त्याच पोलिसांवर त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांना विश्वास दाखवता येऊ नये हे दुर्दैवी आहे, असेही सावंत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details