मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून जी दुर्घटना घडली, त्यामध्ये माणसांचे हकनाक बळी गेले. मंत्री मात्र, या घटनेचे खापर निसर्गावर फोडत असून, त्यांना शरम वाटली पाहीजे असे वक्तव्य करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं, त्यामुळेच तिवरे धरण फुटल्याचे वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते.
'या' मंत्र्याला शरम वाटली पाहिजे, सचिन सांवतांचा निशाणा - shivsena
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून जी दुर्घटना घडली, त्यामध्ये माणसांचे नाहक बळी गेले. मंत्री मात्र, या घटनेचे खापर निसर्गावर फोडत असून, त्यांना शरम वाटली पाहिजे असे वक्तव्य करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला
सचिन सांवत
मंत्र्यांचा निगरगट्टपणा वाढत चालला आहे. हे भयानक असल्याचे सावंत म्हणाले. चिपळूणमधले तिवरे धरण फुटल्याने २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी १९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून शोध कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे. अशात जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचे अजब तर्कट समोर आले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला संताप आणणारे हे वक्तव्य आहे.
Last Updated : Jul 5, 2019, 1:05 PM IST