महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूनम महाजनांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा काँग्रेसचा आरोप; न्यायालयात जाण्याचा इशारा - court

भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी प्रतिज्ञापत्रात आयोगाला खोटी माहिती दिली. महाजन यांच्या पतीसोबत २ कंपन्यातील व्यवहाराबाबत महाजन यांनी माहिती दिली नाही. तसेच पूनम महाजन यांनी कोट्यवधींचे बँकांचे कर्ज हेतुपुरस्सर थकवलेले असल्याचा आरोप सावंत यांनी केला.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची पत्रकार परिषद

By

Published : Apr 27, 2019, 7:39 PM IST

मुंबई- उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आर्थिक माहिती लपवली आहे. त्यांनी कर्ज न फेडल्याप्रकरणी बँकांनी त्यांच्यावर दावा दाखल केल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. माहिती लपवून महाजन यांनी लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मुंबई काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सावंत यांनी यासंदर्भात माहिती दिली.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची पत्रकार परिषद

भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी प्रतिज्ञापत्रात आयोगाला खोटी माहिती दिली. महाजन यांच्या पतीसोबत २ कंपन्यातील व्यवहाराबाबत महाजन यांनी माहिती दिली नाही. तसेच पूनम महाजन यांनी कोट्यवधींचे बँकांचे कर्ज हेतुपुरस्सर थकवलेले असल्याचा आरोप सावंत यांनी केला. याबाबत पंजाब नॅशनल बँक आणि भारतीय स्टेट बँकेने महाजन यांच्याविरोधात दावा दाखल केल्याची माहितीही त्यांनी आयोगाला दिली नसल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले.

फिनिक्स ऑटो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाजन यांचे पती वजेंदा वेंकटेश राव त्यांची असून या कंपनीत पूनम महाजन ही २०१५ पर्यंत संचालक होत्या. तसेच आद्य मोटर कार आणि आद्य रेअलेटर्स या कंपन्यांमध्येही पूनम महाजन संचालक होत्या. या कंपन्याच्या नावे एकूण ६७ कोटी ८५ लाख रुपयांचे थकीत कर्ज आहे. आर्थिक क्षेत्राचा अहवाल देणाऱ्या सीबील या संस्थेने याबाबतची माहिती १२ एप्रिलला दिली असल्याचेही सावंत यांनी सांगितले. ही सर्व माहिती महाजन यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना होती. मात्र, त्यांनी निवडणूक आयोगापासून ही माहिती लपवली असल्याने काँग्रेस याबाबत न्यायालयात जाणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले. काँग्रेसच्या आरोपांबाबत महाजन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details