मुंबई - मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा हस्ते मिलिंद देवरा यांचा निवडणूक संपर्क कार्यलयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शरद पवरांना जाण्यासाठी जागा व्हावी म्हणून काँग्रेस आमदार अमिन पटेलांना मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष सचिन अहिरांनी धक्कबुक्की केली आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी नेत्यांचे एकमेकांशी पटत नसल्याचे समोर आले आहे.
काँग्रेस आमदार अमिन पटेलांना सचिन अहिरांची धक्काबुक्की - Mumbai
शरद पवरांना जाण्यासाठी जागा व्हावी म्हणून काँग्रेस आमदार अमिन पटेलांना मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष सचिन अहिरांनी धक्कबुक्की केली आहे.
काँग्रेस आमदार अमिन पटेलांना सचिन अहिरांची धक्काबुक्की
मिलिंद देवरा यांच्या निवडणूक कार्यलायाच्या उद्घाटनानंतर शरद पवारांची सभा झाली. त्यानंतर शरद पवारांना उल्हासनगर येथील सभेला जाणार होते. त्यावेळी शरद पवार येथून जाताना गर्दीत सचिन अहिर हे अमिन पटेल यांना जोरजोरात धक्का देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे.
संपर्क कार्यालय उद्घाटनप्रसंगी शरद पवार, सचिन अहिर, मिलिंद देवरा, अमिन पटेल व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.