मुंबई- चीनने पेच टाकला आहे व आम्ही हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या कैचीत अडकून पडलो आहोत. काश्मीर खोऱ्यात शांतता नांदायला तयार नाही. सीमेवर धुमशान व आतमध्ये कमालीची खदखद आहे. काश्मीरातील विषय गंभीर आहे. मात्र, चीनच्या आक्रमकतेकडे आणि घुसखोरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या जोशात पाकिस्तानला दम भरला जातो, त्याच पद्धतीने चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज आहे, असे आजच्या सामनातून केंद्र सरकारला सांगण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारच्या पाकिस्तान आणि चीनच्या बाबतीत वेगवेगळ्या भुमिकांवरून ताशेरे ओढण्यात आले आहेत.
वाटल्यास श्रीनगर, पाकव्याप्त काश्मीरवर भगवा फडकवण्यासाठी भाजपच्या पुढाऱ्यांची नियुक्ती करा, अशी खोचक टीका करत चिनी सैन्याला कधी रोखणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. डोकलाममध्ये चिनी सैन्य घुसले. हिमाचल, अरुणाचल, उत्तराखंडच्या सीमेवर ते घुसण्याच्या तयारीत आहे आणि लडाखमध्ये ते ठाण मांडून बसले आहे. त्याची कुणाला चिंता आहे का? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
जमिनीवर ताबा घेतल्यानंतर वाटाघाटी करणं आश्चर्यकारक
चिनी सैन्य घुसखोरी करून भारताच्या हद्दीत घुसले मात्र, आता ते माघारी जायला तयार नाही. यासंदर्भात दोन्ही देशातील सैन्य आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहे. त्यांनी आपल्या जमिनीवर ताबा घेतल्यानंतरही आपण चर्चा करणं हे आश्चर्चकारक आहे, असेही सामनात म्हटले आहे. आपली जमीन असूनही पंतप्रधान, संरक्षणमंत्री किंवा भाजप पुढाऱ्यांनी चिनी सैन्याला दम भरल्याचे दिसत नाही, अशी टीकाही केंद्र सरकारवर करण्यात आली आहे. हे सर्व केवळ पाकिस्तानसाठीच असावं, अशी कोपरखळीदेखील सामनात लगावण्यात आली आहे.
भूतानमध्ये चिनी सैन्यात गाव घेतले ताब्यात