महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसेचे शॅडो कॅबिनेट म्हणजे 'हा खेळ सावल्यांचा', सेनेचा खोचक टोला - मनसेच्या शॅडो कॅबिनेट सेनेची टीका

मनसेने स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटच्या मुद्यावरुन सेनेने मनसेला खोचक टोला लगावला आहे. मनसेचे शॅडो कॅबिनेट म्हणजे हा खेळ सावल्यांचा नाट्यप्रयोग असल्याचे सेनेने म्हटले आहे.

saamana editorial on MNS for shadow cabinet
सेनेचा मनसेला खोचक टोला

By

Published : Mar 11, 2020, 12:18 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम ९ मार्चला पार पडला. या कार्यक्रमात मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. हे शॅडो कॅबिनेट सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी निर्माण केल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सांगितले. मात्र, यावर शिवसेनेने मुखपत्र सामनातून खोचक टीका केली आहे. शॅडो कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे हा खेळ सावल्यांचा नाट्यप्रयोग ठरू नये, असे म्हणत सेनेने मनसेला टोला लगावला आहे. तसेच महाराष्ट्रात विनोद शिल्लक असून राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसल्याचे सेनेने म्हटले आहे.

विरोधकांचे फुटकळ प्रयोग

राज्यात झालेल्या नव्या घडामोडींमुळे देशातील राजकारणाला नवे वळण लागले आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला एका रात्रीत विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागल्याचे सेनेने म्हटले आहे. भाजप हा विरोधी पक्षात असला तरी सत्ताधारी असल्याच्या तोरात वावरत असल्याचे सेनेने म्हटले आहे. विरोधी पक्षनेत्याचे स्थान हे सत्ताधाऱ्यांच्या तोडीस तोड असते, पण विरोधी पक्षाच्या नेत्याचे स्थान आणि कार्य नेमके काय याबाबत आपल्याकडच्या राजकारण्यांना अज्ञान असल्याचे सेनेने म्हटले आहे. त्यामुळेच राज्य विरोधी पक्ष फुटकळ प्रयोग करत असल्याचे सेनेने म्हटले आहे.

१०५ वाल्यांनी बनवले नाही अन् १ आमदार असणाऱ्यांनी...

शॅडो कॅबिनेट कोणी तयार करावे याबाबत काही संकेत आहेत. बा प्रयोग संसदेतील प्रमुख आणि प्रबळविरोधी पक्षाने करायचा असतो. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे व तिथे भाजप हा एक प्रबळ विरोधी पक्ष आहे. त्यांचे १०५ आमदार असून, त्यांनी शॅडो मंत्रीमंडळ बनवले नाही पण एक आमदार असणारांनी ते बनवले, असा टोलाही सेनेने मनसेला लगावला.

...त्यासाठी आमदार, खासदारा निवडून आणावे लागतात

शॅडो मंत्रीमंडळ बनवण्यासाठी आधी आमदार खासदार निवडून आणावे लागतात, तसे मनसेचे काहीच दिसत नाही. त्यात शॅडो वाल्याचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. शॅडो मुख्यमंत्री हा अधिकृत विरोधी पक्षनेता असतो. या शॅडो मंत्रीमंडळास शपथ देण्यासाठी एखादा शॅडो राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्ङणजे खेळ अधिकच रंगतदार झाला असता, असा टोला सेनेने मनसेला लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details