महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुस्तीतले खरे वस्ताद पवारच, उतू नका मातू नका नाहीतर माती होईल, सेनेचा भाजपला टोला

महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिलेला कौल मान्य आहे.  राज्याच्या जनतेला उतमात कधीच मान्य नव्हता, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे.

सेनेचा भाजपला टोला

By

Published : Oct 25, 2019, 1:19 PM IST

मुंबई -महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिलेला कौल मान्य आहे. राज्याच्या जनतेला उतमात कधीच मान्य नव्हता, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. ईव्हीएममधून फक्त कमळेच बाहेर पडतील असा मुख्यमंत्र्यांना आत्मविश्वास होता. मात्र, १६४ पैकी ६३ ठिकाणी कमळे फुललीच नाहीत. त्यामुळे उतू नका मातू नका नाहीतर माती होईल, असे म्हणत सेनेने भाजपला एक प्रकारे इशाराच दिला आहे. तर मातीतल्या कुस्तीतले खरे वस्ताद शरद पवारच असल्याचे सेनेने मान्य केले आहे.

युती असतानाही जागांची घसरण

विधानसभेचे निकाल पाहता सत्ता स्थापन करण्याइतपत बहुमत महायुतीकडे आहे. मात्र, २०१४ ची परिस्थिती पाहता सेनेची जागांची घसरण झाली हे मान्य करावे लागेल. २०१४ ला युती नसून सेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी युती असूनही सेनेला ५६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, आम्हाला हा जनतेचा कौल मान्य आहे. हा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारला असल्याचे सेनेने म्हटले आहे.

सत्ताधाऱ्यांना मिळालेला धडा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून १०० जागांचा आकडा गाठला आहे. एक मजबूत विरोधी पक्षनेता म्हणून जनतेने त्यांच्यावर जबाबदारी टाकली असल्याचे सनेने म्हटले आहे. मात्र, या निवडणुकीवरुन सत्ताधाऱ्यांना धडा मिळाला आहे. धाक, दहशत, सत्तेची मस्ती याला न जुमानता मतदारांनी मतदान केल्याचे सेनेने म्हटले आहे. तसेच बिनधडाच्या काँग्रेसला ४४ जागा मिळाळ्या असल्याचे सेनेने म्हटले आहे.

कुस्तीतले वस्ताद शरद पवारच

मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी स्वत:ला मातीतला कुस्तीतील तेल लावलेला पैलवान असे घोषीत केले होते. मात्र, तेल थोडे कमी पडले. खरे मातीतल्या कुस्तीतल वस्ताद हे शरद पवारच ठरल्याचे सेनेने म्हटले आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाचा या निवडणुकीत पुन्हा कस लागला. ते एका जिद्दीने लढले. महाराष्ट्राच्या जनतेला उतमात मान्य नव्हता. आमचे पाय जमिनीवरच असल्याचे सेनेने म्हटले आहे.

टोप्या बदलणाऱ्यांना जनतेने घरी बसवले, उदयनराजेंना टोला

पक्ष फोडून पक्षांतरे करुन मोठा विजय मिळवता येतो हा भ्रम आहे. हा भ्रमाचा भोपळा जनतेने फोडला आहे. टोप्या बदलणाऱ्यांना जनतेने घरी पाठवल्याचे म्हणत सेनेने उदयनराजेंना टोला लगावला आहे. शिवरायांचे वशंज म्हणून वावरणाऱ्या उदयनराजेंचे वर्तन नितीमत्तेचे असायला हवे होते. छ्त्रपतींचे नाव घेऊन जर कोणी अल्टी-पल्टी करत असेल तर ते चालणार नाही सातारकरांनी दाखवून दिल्याचे सेनेने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details