महाराष्ट्र

maharashtra

राम मंदिर भूमिपूजन म्हणजे 'ऐतिहासिक सुवर्णक्षण'!

By

Published : Aug 5, 2020, 12:56 PM IST

'रामायण' हा हिंदुस्थानी जनेतेचा प्राण आहे आणि राम हा रामायणाचा प्राण आहे. रामाला मर्यादापुरुषोत्तम आणि एकवचनी मानले जाते. अशा रामाचे त्याच्याच जन्मभूमीच भव्य मंदिर उभारता यावे यासाठी हिंदूंना मोठा लढा द्यावा लागला. प्रत्यक्ष भूमी आणि न्यायालायत अशा दोन पातळ्यावर हा लढा झाला. आज रामजन्मभूमीच्याच जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होत आहे. हा सर्व हिंदुस्थान वासीयांसाठी गर्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

Ram Temple
राम मंदिर

मुंबई - आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे, त्याचा आनंदच होत आहे. 'बाबरी पाडली, ती पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे', असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे कोट्यवधी हिंदू लोकांच्या मनात त्यांचे अढळ स्थान निर्माण झाले. अयोध्येच्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे. असंख्य रामभक्तांच्या त्यागातून, संघर्षातून आणि बलिदानातून राम मंदिर उभे राहत आहे, हे विसरून चालणार नाही. हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील, असे सामन्यात म्हटले आहे.

'रामायण' हा हिंदुस्थानी जनेतेचा प्राण आहे आणि राम हा रामायणाचा प्राण आहे. रामाला मर्यादापुरुषोत्तम आणि एकवचनी मानले जाते. अशा रामाचे त्याच्याच जन्मभूमीच भव्य मंदिर उभारता यावे यासाठी हिंदूंना मोठा लढा द्यावा लागला. प्रत्यक्ष भूमी आणि न्यायालायत अशा दोन पातळ्यावर हा लढा झाला. आज रामजन्मभूमीच्याच जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होत आहे. हा सर्व हिंदुस्थान वासीयांसाठी गर्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

राम मंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण मुस्लीम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना पाठवण्यात आले. इक्बाल अन्सारी हे एकटे नव्हते मात्र, बाबरी अ‌ॅक्शन कमिटीचा तो एक प्रमुख चेहरा होता. अन्सारीने ३० वर्षे न्यायालयीन लढाई खेचली. मात्र, सर्वोच्च न्यायलयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शेवटी वाद मिटला. मुस्लीम बांधवांनाही न्यायालयाने नाराज केले नाही. त्यांनाही अयोध्येतच जागा दिली. आता राम मंदिराच्या भूमिपूजनाने हा सर्व संघर्ष संपावा, असा आशावाद अग्रलेखात व्यक्त केला आहे.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमात न्यामूर्ती रंजन गोगोई कुठेतरी दिसायला हवे होते. मात्र, गोगोई निमंत्रितांमध्ये नाहीत आणि बाबरी पायापासून उद्ध्वस्त करणारी शिवसेनाही नाही. राम मंदिराच्या भूमिपूजनाचे श्रेय घेण्यासाठी किती हा अट्टाहास! भूमिपूजनाचा सोहळा हा तमाम हिंदूंचा आहे. मात्र, तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष केंद्रित झाला आहे. जिथे श्रीराम स्वत: कौटुंबिक राजकराणाचे बळी ठरले होते, तिथे इतर पामरांचे काय? असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

राम मंदिराच्या राजकारणाबाबत वेगळी भूमिका असूनही काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि डाव्या पक्षातील अनेकजण राम मंदिर व्हावे या श्रद्धेचे होते. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि माजी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या काळात बाबरीचे पतन झाले. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याणसिंह होते. बाबरी उद्ध्वस्त होताच त्यांनी राजीनामा दिला. राम मंदिरासाठी त्यांनी आपल्या खुर्चीचा त्याग केला. मात्र, ते कल्याणसिंग आजच्या सुवर्णक्षणी मंचावर नाहीत. लालकृष्ण आडवाणी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन नेत्यांनी हिंदुत्वाची ज्वाला पेटती ठेवली. हिंदूंच्या छातीवर पाय ठेवून कुणाला राजकारण करता येणार नाही हे त्यांनी दाखवून दिले. असो, आता सर्व राजकारण बाजूला ठेवून राम मंदिर पूर्व व्हावे, ही इच्छा असल्याचे सामनात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details