महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

PMC Bank : ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - एस. राजनीत सिंग - S Rajneet Singh

पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यावर ग्राहकांमध्ये आपले पैसे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपले पैसे बँकेतून काढण्यासाठी रांगा लावल्या आहेत. याबाबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय थॉमस यांनी बँकेमध्ये 7 ते 8 वर्षापासून अनियमितता असल्याचे मान्य केले आहे. तर, आम्ही यामधून बाहेर पडण्याचा मार्ग सांगणार असतानाच रिझर्व्ह बँकेने आमच्यावर निर्बंध लादल्याचे, त्यांनी सांगितले आहे.

एस राजनीत सिंग, पीएमसी बँक संचालक

By

Published : Sep 29, 2019, 5:26 PM IST

मुंबई- पीएमसी बँकेच्या कामात अनियमितता आढळल्याने या बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लावले आहेत. यानंतर बँकेसमोरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मात्र, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय थॉमस यांनी बँकेमध्ये अनियमितता असल्याचे मान्य करतानाच रिझर्व्ह बँकेवरही आर्थिक अडचणींचे खापर फोडले आहे. तर, पीएमसी बँकचे संचालक व भाजपचे मुलुंड येथील आमदार सरदार तारासिंग यांचा मुलगा एस. राजनीत सिंग यांनी एका व्हिडिओद्वारे 'खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. त्यांनी सोशल मिडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये,' असे आवाहन केले आहे.

एस राजनीत सिंग, पीएमसी बँक संचालक

रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर ग्राहकांमध्ये आपले पैसे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्राहकांनी आपले पैसे बँकेतून काढण्यासाठी रांगा लावल्या आहेत. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय थॉमस यांनी बँकेमध्ये 7 ते 8 वर्षापासून अनियमितता असल्याचे मान्य केले आहे. मात्र, 'आम्ही यामधून बाहेर पडण्याचा मार्ग सांगणार असतानाच रिझर्व्ह बँकेने आमच्यावर निर्बंध लादले. यामुळे बँकेसमोरच्या आर्थिक अडचणींमध्ये अधिकच वाढ झाली,' असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -खूप पैसे आले म्हणजे अक्कल येत नाही, जितेंद्र आव्हाडांचा काकडेंना टोला

थॉमस यांनी रिझर्व्ह बँकेने आम्हाला वेळ दिला नाही, असा आरोप केल्यावर बँकेचे संचालक आणि भाजपचे आमदार तारा सिंग यांचा मुलगा एस. राजनीत सिंग यांनी व्हिडीओद्वारे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे ग्राहकांना संचालक मंडळाच्या वतीने आवाहन केले आहे. सोशल मीडियावर सरदार तारासिंग यांचे कुटुंबीय पैसे घेऊन पळून जात आहेत, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामध्ये तथ्य नसल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

31 मार्च 2019 ला 99.69 कोटींचा बँकेला फायदा होता. जॉय थॉमस यांनी प्रेस घेऊन एचडीआयएलला दिलेल्या कर्जाची माहिती संचालक मंडळ आणि रिझर्व्ह बँकेला देण्यात आली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. संचालक मंडळाचा आणि कर्जाचा काही संबंध नाही. जे काही कर्ज दिले आहे. ते जॉय थॉमस यांच्या मंजुरीनंतर देण्यात आले, असेही सिंग यांनी सांगितले.

हेही वाचा -वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू, उमेदवार जाहीर करण्याची शक्यता

बँकेच्या ग्राहकांनी गडबडून जाऊ नका, घाबरू नका, तुमचे पैसे वेळेवर परत मिळतील. बँकेमधून एक 1 हजार रुपये दिले जात होते. त्यात वाढ करून 10 हजार रुपये सध्या दिले जाते आहेत. ही रक्कम वाढवली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तुमचे पैसे सुरक्षित आहेत. भीती बाळगू नका. आम्ही तुमच्या सेवेत होतो आणि यापुढेही सेवेत राहू, असे एस. राजनीत सिंग यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details