मुंबई: मुंबईतील अंधेरी (पूर्व) विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांनी आरामशीर आघाडी घेतली आहे. १९ फेऱ्या आहेत. अजून ८ फेऱ्या बाकी आहेत. ऋतुजा लटके यांना ७० हजाराच्या आसपास मते मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात उभा असलेल्या ६ पैकी एकाही उमेदवाराला १ हजार मतांचा टप्पा अजून ओलांडता आला नाही. ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आणखी मतमोजणी बाकी आहे. ऋतुजा लटके यांच्या विरोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांची अमानत रक्कम जप्त होणार आहे.
आतापर्यंत मोजण्यात आलेल्या ५,६२४ मतांपैकी लटके यांना ४,२७७ मते मिळाली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीच्या शेवटी नोटाच्या बाजूने 622 मते पडली. जी रिंगणात असलेल्या इतर सहा अपक्ष उमेदवारांपैकी प्रत्येकाला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त होती. रविवारी सकाळी 8 वाजता मुंबईतील शाळेत मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी प्रक्रियेत तब्बल 200 अधिकारी सहभागी झाले होते.