मुंबई -रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे मुंबई विमानतळावर मोठा अपघात होता होता टळला. मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील रनवेवर स्पाईस जेटच्या विमान क्रमांक ६२३७ हे विमान घसरल्याने मुंबई विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या विमानातून १६७ प्रवासी प्रवास करत होते. या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
मुंबई विमानतळावर विमान घसरले; ५४ विमानांचे मार्ग वळवले, ५२ उड्डाणे रद्द - mumbai
मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील रनवेवर स्पाईस जेटचे विमान क्रमांक ६२३७ हे विमान घसरल्याने मुंबई विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबई विमानतळावर विमान घसरले; ५४ विमानांचे मार्ग वळवले, ५२ उड्डाणे रद्द
ही घटना घडल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप विमानाबाहेर काढण्यात आले आहे. धावपट्टीवरील घसरलेले विमान बाजूला काढून पार्किंग बे वर नेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान मुंबई विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत काम केले जात आहे.
Live Updates-
- मुख्य विमानतळावरील मार्ग हा बंद करण्यात आला आहे. दरम्यान पर्यायी धावपट्टी कार्यरत राहणार आहे.
- दरम्यान, यानंतर अनेक ५४ विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. तर, ५२ विमान रद्द करण्यात आले आहेत.
Last Updated : Jul 2, 2019, 12:24 PM IST