मुंबई - पवई परिसरातर रस्त्यावर उभ्या असलेल्या महाविद्यालयीन तरुणाला उधळलेल्या दोन बैलांनी धडक दिली. या धडकेत हा तरुण जखमी झाला आहे. अक्षय लाथा असे या तरुणाचे नाव आहे. त्याला विक्रोळीतील शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
VIDEO: उधळलेल्या बैलांच्या धडकेत महाविद्यालयीन तरुण जखमी - pawai
पवई परिसरातील मुंबई आयआयटीजवळ अक्षय उभा होता. यावेळी रस्त्यावरून अचानकच दोन बैल धावत आले आणि त्यांनी अक्षयला जोरदार धडक दिली.

बैलांच्या धडकेत महाविद्यालयीन तरुण जखमी
बैलांच्या धडकेत महाविद्यालयीन तरुण जखमी
या घटनेत अक्षयला सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, तरीही त्याला विक्रोळीतील शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय लाथा हा त्रिवेन्द्रन इंजिनियरिंग महाविद्यालयाचा विद्यार्थी असून मुंबई आयआयटी येथे इंटर्नशिपसाठी आला होता. गुरुवारी सकाळी १० वाजता घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.