महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

RTPCR Test : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटीपीसीआर चाचण्यांना या तारखेपासून सुरुवात

नवीन विषाणूला रोखण्यासाठी त्याची आधी ओळख होण्यास गरजेचे आहे. याकरिता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोविडचे प्रोटोकॉल आणि आरटीपीसीआर या चाचण्या उद्या 24 डिसेंबरपासून ( RTPCR tests Start from 24th December ) सुरू केल्या जाणार आहेत. या चाचण्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे प्रवासी विमानतळावर पोहोचतील तेव्हा त्यांची त्वरित चाचणी केली जाईल. चाचणीनंतर त्यांचा जसा रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील कार्यवाही आणि औषधोपचार केले जातील.

RTPCR Test
आरटीपीसीआर

By

Published : Dec 23, 2022, 9:40 PM IST

मुंबई :शहरातीलछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) शासनाच्या आदेशा नंतरही कोणतेही कोविड प्रोटोकॉल किंवा चाचण्या सुरू केल्या नव्हत्या; मात्र आता विमानतळ प्राधिकरणाने कोविड प्रोटोकॉल आणि चाचण्या घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. 24 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचण्या ( RTPCR tests Start from 24th December ) केल्या जाणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

चाचण्यांना होणार सुरूवात : कोविडचा नवा अवतार बी एफ 7 नवीन व्हेरियंटमुळे पुनः पुढील लाट येते की काय अशी धाकधूक सर्वांना आहे आहे. कारण जनतेच्या मनात मागील अनुभव आहे. आता ब्राझील, द.कोरिया ,जापान आणि सर्वात चर्चेचा विषय ठरला चीन देश ह्या देशात कोविड १९ च्या नवीन व्हेरियंटचे संक्रमित रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे भारतातही चिंता वाढली आहे.केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला सवधनातेचा इशारा दिलाय. दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाबाबत महाराष्ट्र शासनही सतर्क झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड-19 ची परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला आणि कृती दल स्थापन करण्याचे घोषित केले. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी देखील विमानतळावर आणि इतर ठिकाणी चाचण्या करण्यात येतील असे सुचित केले होते .मात्र कोविड संसर्ग पसरण्याची शक्यता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमान प्रवास हे आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चाचण्या होण्यासाठी शासनाने गतिमान हालचाली सुरू केल्या.

घाबरून जाता कामा नये :यासंदर्भात डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, कोरोना महामारी पसरते. त्याचे एक कारण आंतरराष्ट्रीय विमान प्रवास देखील आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने या सर्व महत्त्वाच्या चाचण्या करायला हव्याच. परंतु घाबरून जाता कामा नये आणि सार्वजनिक ठिकाणी जनतेने मुखपट्टी वापरायला आता आजपासूनच सुरुवात करायला हवी. चीन संदर्भात बातम्यातून ज्या रीतीने माहिती समोर येते आहे. तितकी गंभीर परिस्थिती नाही. स्वतः काही भारतीय डॉक्टरांनी चीन मधल्या डॉक्टरांसोबत ऑनलाइन संवाद साधला असता ही बाब प्रकर्षाने जाणवली. कारण या नवीन विषाणूमुळे मृत्यूचं प्रमाण अत्यंत कमी आहे. विलगिकरण घरी केल्यावर देखील नियमाचे पालन केले आणि औषधोपचार वेळेत घेतल्यावर रुग्ण लवकर बरा होतो.

उपाययोजनेला सुरूवात : चाचण्या संदर्भात विमानतळ प्राधिकरणाचे प्रवक्ते यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना माहिती दिली की ,केंद्र शासनाने जारी केलेले आदेशानुसार आम्ही विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा चाचण्या सुरू करीत आहोत. कोरोना महामारी फैलावण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी हा उपाय सुरू करीत आहे. प्रवाशांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे जरुरी आहे. कोणतेही प्रवासी विमानतळावर पोहोचतील .त्यानंतर त्यांच्या नियमानुसार चाचण्या केल्या जातील. त्यासाठी सहा काउंटर आणि तीन संपलींग बूथ आम्ही तयार करीत आहोत जेणेकरून प्रवाशांना सोयीचे होईल. इंडियन मेडिकल असोसिएशन IMA यांच्या निर्देशाचे पालन करीत या सर्व चाचण्या केल्या जातील.

ABOUT THE AUTHOR

...view details