महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महापालिका कार्यालयात कर्मचाऱ्यांना लसीकरण, आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची - मुंबई शहर बातमी

मुंबईमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि महापालिकेने कडक निर्बंध घातले आहेत. महापालिकेच्या मुख्यालय आणि सर्व कार्यालयात सामान्य नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. तर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करून निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगावा लागणार आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 7, 2021, 5:23 PM IST

Updated : Apr 7, 2021, 5:57 PM IST

मुंबई- मुंबईमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि महापालिकेने कडक निर्बंध घातले आहेत. खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. सरकारी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती बंधनकारक केले आहे. तर महापालिकेच्या मुख्यालय आणि सर्व कार्यालयात सामान्य नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. तर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करून निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगावा लागणार आहे.

माहिती देताना प्रतिनिधी

लसीकरण, आरटीपीसीआर चाचणी

मुंबईत कोरोना वाढत असल्याने महापालिकेने मुख्यालय आणि पालिकेच्या सर्वच कार्यलयात नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. नागरिकांना तक्रारी आणि पत्रव्यवहार करता यावा म्हणून पालिकेच्या कार्यालयाखाली टपाल घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई महापालिका मुख्यालय आणि इतर कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तो पर्यंत कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर टेस्ट करून निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगावा लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले नाही. अशा सर्व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्यासाठी चाचण्या कुठे होतात याची शोधाशोध सुरू झाली आहे.

यांनाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

महापालिकेच्या स्मशान भूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लसीकरण करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लसीकरण झाले नसेल तर त्यांनाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. बेस्टमध्ये काम करणारे कर्मचारी, दुकानदार, मॉलमध्ये दुकान सुरू ठेवायची असल्यास त्या दुकानदारालाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. लग्न लागणाऱ्या मंगल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही लसीकरण आणि तो पर्यंत आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

हेही वाचा -महाराष्ट्रात लसीचा तुटवडा, केवळ ३ दिवस पुरेल एवढी लस राज्यात उपलब्ध - आरोग्यमंत्री

हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख यांना दिलासा मिळणार का? काय आहे कायदेतज्ज्ञांचे मत

Last Updated : Apr 7, 2021, 5:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details