मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ नेते अविनाश महातेकर यांच्या मातोश्री कृष्णाबाई शरद महातेकर यांचे आज निधन झाले. कृष्णाबाई यांनी वयाच्या ९०व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
रिपाइंचे जेष्ठ नेते अविनाश महातेकर यांना मातृशोक - Avinash Mahatekar mumbai
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ नेते अविनाश महातेकर यांच्या मातोश्री कृष्णाबाई शरद महातेकर यांचे आज निधन झाले. कृष्णाबाई यांनी वयाच्या ९०व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
अविनाश महातेकर यांना मातृशोक
कृष्णाबाई यांची काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अविनाश महातेकरांनी दिली. त्यांच्या पाश्चात दोन मुले, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कृष्णाबाई महातेकर यांच्या निधनाने समाजाची माऊली हरपल्याची भावना रिपाइंचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे. कृष्णाबाई यांच्या पार्थिवावर विक्रोळीच्या टागोर नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती रिपाइंचे जेष्ठ नेते अनिल लोखंडे यांनी दिली.