मुंबई- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी ही भीम अनुयायांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी व इतर सर्व धर्मीय धार्मिक स्थळे उघडण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात दादर येथील चैत्यभूमी येथे आंदोलन केले.
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करा, आरपीआयचे मुंबई चैत्यभूमी येथे आंदोलन - Ramdas Athawale protest chaityabhoomi
धार्मिक स्थळी जाऊन कोरोना होणार नाही. असे करताना योग्य ती खबरदारी घेतली जाईल. सरकारने यावर उपाययोजना राबवण्याबाबात व नियम घालन्याबाबत चर्चा करावी. तसेच, सरकारने योग्य खबरदारी घेत सर्व धर्मिक स्थळे उघडावी, अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
आरपीआय आंदोलन
सर्व धर्मीय स्थळे खुली करण्याची आमची मागणी आहे. धार्मिक स्थळी जाऊन कोरोना होणार नाही. असे करताना योग्य ती खबरदारी घेतली जाईल. सरकारने यावर उपाययोजना राबवण्याबाबात व नियम घालन्याबाबत चर्चा करावी. तसेच, सरकारने योग्य ती खबरदारी घेत सर्व धार्मिक स्थळे उघडावी, अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
हेही वाचा-मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेची पवारांनी घेतली पोलीस आयुक्तांकडून माहिती