महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंगना रणौत-संजय राऊत ट्विटर वॉर : अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी आरपीआय मैदानात

सिने अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सध्या ट्विटर वॉर सुरू आहे. तर कंगनाच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. तिने मुंबईत पाऊस ठेऊन दाखवावे, असा इशारा दिला आहे.

RAMDAS ATHAWALE
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

By

Published : Sep 7, 2020, 3:52 PM IST

Updated : Sep 7, 2020, 4:43 PM IST

मुंबई -सिने अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सध्या ट्विटर वॉर सुरू आहे. तर कंगनाच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. तिने मुंबईत पाऊस ठेऊन दाखवावे, असा इशारा दिला आहे. तर कंगनानेही हे आव्हान स्विकारत, 'मी 9 सप्टेंबरला मुंबईत येतेय, काय करायचे ते करा' असे आव्हान दिले आहे. यात आता केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. 9 सप्टेंबरला कंगनाला आरपीआयचे कार्यकर्ते सुरक्षा देणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी दिली. आठवले ईटीव्ही भारतसोबत बोलत होते.

कंगना रणौत-संजय राऊत ट्विटर वॉर : अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी आरपीआय मैदानात

ते म्हणाले, आपण कंगनाची भेट घेत तिने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावर आपलीही नाराजी असल्याचे सांगणार आहेत. तर असे वक्तव्य, वाद पुन्हा होऊ नये यासाठीही ते तिच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

9 सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबई पोलीस आणि मुंबईबद्दल बेताल-अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या कंगनाला धडा शकवू, असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या वादाची केंद्र सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार आता केंद्राकडून कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर दुसरीकडे याआधीच आठवले यांनी कंगनाला आरपीआय सुरक्षा देईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी पुन्हा एकदा याबाबतची भूमिका मांडली आहे. 9 सप्टेंबरला कंगना जेव्हा मुंबई विमानतळावर येईल तिथपासून पुढे आरपीआयचे कार्यकर्ते तिचे संरक्षण करतील, असे त्यांनी सांगितले.

याप्रकरणी बोलताना आठवले यांनी राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. एका महिलेबद्दल बोलताना कानाखाली देण्याची भाषा करणे, हे त्यांना शोभत नाही. कुणाच्या कानाखाली घ्यायचीच असेल तर मग त्यांनी चीनमध्ये जाऊन चिन्यांच्या कानाखाली द्यावी, असा टोलाही लगावला आहे. मात्र, त्याचवेळी आठवले यांनी कंगनालाही कानपिचक्या दिल्या आहेत. कंगनाने मुंबईबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचेच आहे. त्यामुळे तिची भेट घेत असे वक्तव्य यापुढे कधी करू नये, असे तिला सांगणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. आता 9 सप्टेंबरला कंगना मुंबईत दाखल झाल्यानंतर नेमके काय होते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Sep 7, 2020, 4:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details