महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हाथरस प्रकरणाचा आरपीआयकडून निषेध; पीडितेला लवकर न्याय देण्याची मागणी

उत्तरप्रदेशमधील हाथरस घटनेचा आरपीआयकडून निषेध व्यक्त करण्यात आला. आरपीआयने या घटनेचा निषेध व्यक्त करत मुंबईत आंदोलन केले. यावेळी पीडितेला लवकर न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

Rpi condemn hathras matter
हाथरस प्रकरणाचा आरपीआयकडून निषेध

By

Published : Oct 1, 2020, 4:06 PM IST

Updated : Oct 1, 2020, 5:04 PM IST

मुंबई -उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे एका युवतीवर सामूहिक आत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी आणि तिच्या परिवाराला आर्थिक मदत करावी, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आरपीआय) केली आहे. या मागणीसाठी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांच्या नेतृत्वाखाली सीएसटी येथे निदर्शन करत आंदोलन करण्यात आले.

हाथरस प्रकरणाचा आरपीआयकडून निषेध; पीडितेला लवकर न्याय देण्याची मागणी

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील चंदपा गावातील मुलीवर 14 सप्टेंबरला सामुहिक बलात्कार करून बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. तसेच तिची जीभ कापण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतरही तिचा मृतदेह कुटुंबीयांकडे न देता मंगळवारी रात्री पोलिसांनीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. तसेच घटना घडल्यानंतरही पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने या घटनेच्या निषेधार्थ देशभर निषेध व्यक्त होत आहे.

अनेक ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात येत आहेत. यामध्ये आज (गुरुवारी) आरपीआयने सीएसटी येथे आंदोलन केले. यावेळी मुलींच्या घरच्यांना न्याय देत आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आम्ही करत असल्याचे, आरपीआयच्या महिला अध्यक्ष सीमा आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील या घटनेच्या पीडित कुटुंबीयांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे घरी जाऊन भेट देणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या घटनेत जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात येणार आहेत.

तसेच जर हाथरस प्रकरणातील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर आरपीआयच्या वतीने संपूर्ण देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Last Updated : Oct 1, 2020, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details