महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मी सत्तेच्या मागे जात नाही, मी जिथे जातो, तिथे सत्ता येते - रामदास आठवले - Shivsena

मुंबई प्रदेशचा भव्य रिपब्लिकन कार्यकर्ता मेळावा वरळी सरदार वल्लभाई पटेल स्टेडियम एनएससीआय क्लब येथे घेण्यात आला.

रामदास आठवले

By

Published : Sep 5, 2019, 10:38 PM IST

Updated : Sep 5, 2019, 11:03 PM IST

मुंबई- मी सत्तेच्या पाठी जात नसून, मी जिथे जातो तिथे सत्ता येते, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या मुंबई प्रदेश मेळाव्यात बोलत होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

हेही वाचा -आठवलेंचे छगन भुजबळांना आमंत्रण.. म्हणतात शिवसेनेत न जाता आरपीआयमध्ये यावे

मुंबई प्रदेशचा भव्य रिपब्लिकन कार्यकर्ता मेळावा वरळी सरदार वल्लभाई पटेल स्टेडियम एनएससीआय क्लब येथे घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री सुरेशभाऊ खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, मंत्री महादेव जानकर, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

हेही वाचा -अण्णाभाऊ साठेंबद्दलच्या 'त्या' विधानावरून रामदास आठवलेंनी मागितली माफी

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचे वाजवणार बारा, अशी कविता करत आठवले यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. इंदू मिलच्या जागेची मागणी 20 वर्षांपासून होती. पण, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ही मागणी पूर्ण झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितले होते की, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यायला पाहिजे. आम्हाला यावेळी 8 ते 10 जागा पाहिजेत, महादेव जानकर यांनी 57 जागा मागितल्या आहेत. मात्र, तसे काही होणार नसल्याचे आठवले यांनी सांगितले.

युतीच्या 240 जागा येतील -

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकत्र असतील आणि रिपाइंची साथ असेल तर युतीच्या 240 जागा निवडून येतील. भाजप-शिवसेनेच्या मागे रिपाइं पक्ष उभा राहील. मुंबईत पावसात पाणी साठत आहे. त्यामुळे ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित करणे गरजेचे आहे. तसेच बाबासाहेबांनी सांगितलेला नदी जोड प्रकल्प हाती घेतला पाहिजे, असेही आठवले यांनी सांगितले.

Last Updated : Sep 5, 2019, 11:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details