महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरपीएफने 86 हजार 219 रुपयांची 479 लाइव्ह ई-तिकिटे केली जप्त - लाइव्ह ई-तिकिटे जप्त

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी दलालांविरूद्ध मोहीम अधिक तीव्र केली आहे. लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या या छाप्यात सर्व मिळून 44 दलालांना पकडण्यात आले असून, 86 हजार 219 रुपये किंमतीची 479 लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

RPF Seized 479 live e-tickets, worth Rs. 86 thousand 219
आरपीएफने 86 हजार 219 रु. किंमतीची 479 लाइव्ह ई-तिकिटे केली जप्त

By

Published : Jul 23, 2020, 6:34 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी दलालांविरूद्ध मोहीम अधिक तीव्र केली आहे. लॉकडाउन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या या छाप्यात सर्व मिळून 44 दलालांना पकडण्यात आले असून, 86 हजार 219 रुपये किंमतीची 479 लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

रेल्वेने 12 मे पासून 15 वातानुकूलीत विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. त्यानंतर 1 जून रोजी निवडक विशेष मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या 100 जोड्यांची घोषणा केली. अनेक वैयक्तीक आयडी वापरुन ई-तिकिटे काढण्याची आणि या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा बळकावण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या होत्या. दलालांविरूद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल व इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या या छाप्यांत सर्व मिळून 44 दलालांना पकडण्यात आले आणि 86 हजार 219 किंमतीची 479 लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली.

आतापर्यंत या लॉकडाऊन व अनलॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मुंबई विभागात 22 दलाल पकडले असून, त्यांच्याकडून 328 लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरूद्ध रेल्वे कायद्याच्या कलम 143 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details