मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा देशासह राज्यातही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यात मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊनच्या नियमांचे कडक पालन करण्यात येत आहे. अशा काळात हातावर पोट असणाऱ्या गरिबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा काळात सामाजिक संस्थासंह, राजकीय पक्ष, वेगवेगळ्या संघटना यांच्यासह पोलीस अधिकारीही मदत करत आहेत.
दादरमध्ये आरपीएफ पोलिसांकडून गरिबांना जेवणाचे वाटप - आरपीएफ पोलिसांकडून गरिबांना जेवणाचे वाटप
राज्यात मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊनच्या नियमांचे कडक पालन करण्यात येत आहे. अशा काळात हातावर पोट असणाऱ्या गरिबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा काळात सामाजिक संस्थासंह, राजकीय पक्ष, वेगवेगळ्या संघटना यांच्यासह पोलीस अधिकारीही मदत करत आहेत.
दादरमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांनी रेल्वेच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) यांच्याकडून जेवण देण्यात आले. लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचे जेवणाचे हाल होत आहेत. विशेष करून रस्त्यावर राहणाऱ्यांचे आणि हातावर पोट असलेल्या लोकांचे. अशा लोकांना अनेक सामाजिक संस्था, लोक प्रतिनिधी अन्न धान्य पोहोचवत आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांकडूनही अशा लोकांच्या जेवणाची सोय केली जात आहे. दादर रेल्वे स्थानकाजवळ रस्त्यावर राहणाऱ्या व गरिबांना आरपीएफकडून रोज जेवण दिले जात आहे.