मुंबई -धावत्या रेल्वे गाडीत चढणारी गर्भवती महिला आणि तिच्या मुलाचे प्राण एका आरपीएफ पोलिसाने वाचवले आहे. ही घटना मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात घडली. गर्भवती महिला तिच्या मुलासह धावत्या रेल्वे गाडीत चढत असताना तिचा तोल सुटला व ती फलाट आणि रेल्वेच्या मध्याभागी असलेल्या पोकळीत पडत होती, मात्र आरपीएफ कॉन्स्टेबल अशोक यादव यांनी वेळीच मदत केल्याने महिला व तिच्या मुलाचे प्राण वाचले. यादव यांच्या कार्याचे समाज माध्यमावर कौतुक होत आहे. ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
हेही वाचा -'प्रकाश जावडेकरांनी महाराष्ट्राची माफी मागावी'
अशी घडली घटना
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमावरी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकाच्या प्लाटफॉर्म क्रमांक ५ वर ट्रेन क्रमांक 01091 सीएसएमटी- दानापूर एक्स्प्रेस आली. ती आपल्या नियोजित वेळेत स्थानकावरून पुढच्या प्रवासाला रवाना होत होती, यादरम्यान एका गर्भवती महिलेने आपल्या लहान मुलासह धावत्या ट्रेनमध्ये बसण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या महिलेचा तोल गेल्याने ती फलाट आणि रेल्वे गाडीमधील असलेल्या पोकळीत पडत असताना इतक्यात कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवान अशोक यादव यांनी समयसूचकता दाखवून ट्रेनकडे धाव घेतली व गर्भवती महिला आणि मुलाला पकडून बाजूला केले. त्यामुळे, आई आणि मुलाचे प्राण वाचले. अशोक यादव यांच्या धाडसी कामाची दखल आरपीएफ मध्य रेल्वे प्रशासन यांच्याकडून घेण्यात आली आहे.
गर्भवती महिलेने मानले आभार