महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

World cup 2023 : विश्वचषकाचा भारतच प्रबळ दावेदार, रोहित विश्वचषकात बजावणार मोठी भूमिका

भारतीय संघ यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारताकडं मजबूत संघ आहे. संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचाही फायदा होईल, असा विश्वास भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी म्हटलंय.

World cup 2023
World cup 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 5:52 PM IST

दिनेश लाड माहिती देताना

मुंबई : 5ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. पुढील 45 दिवस भारतासह जगातील क्रिकेटचा फिव्हर पाहायला मिळणार आहे. 2023 क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी प्रत्येक संघांना जोरदार तयारी केलीय. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, न्यूझीलंड या देशांना क्रीडा समीक्षकांनी विश्वचषकाचे दावेदार म्हणून पसंती दिली आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी विश्वचषकासाठी भारतच प्रबळ दावेदार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

रोहित विश्वचषकात मोठी भूमिका बजावणार : क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भारतीय टीमचा कप्तान रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर यांना क्रिकेटचे धडे दिले आहेत. रोहित शर्माच्या आशिया चषकसह काही इनिंग्सच्या खेळांकडं पाहिल्यास त्याचा विश्वचषक जिंकण्यात मोठा वाटा असेल असं म्हटलं आहे. फिटनेसबद्दल बोलताना लाड म्हणाले की, रोहित शर्माच्या क्षेत्ररक्षणाच्या क्षमतेवरुन फिटनेसबद्दल प्रश्नच उद्भवत नाहीय.

विश्वचषकाचा संघ संतुलित : भारताचा विश्वचषक संघ फलंदाज, गोलंदाजांमुळं संतुलित आहे. सर्व फलंदाज फॉर्मात असून बुमराहच्या आगमनानं गोलंदाजी मजबूत झाली आहे. अष्टपैलू खेळाडूही आपल्या संघात असल्याचं दिनेश लाड यांनी म्हटलंय.

विश्वचषकाचा भारतच प्रबळ दावेदार :2023 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतच प्रबळ दावेदार अल्याचं लाड यांनी ईटीव्हीशी बोलतांना सांगितलं. विश्वचषक भारतात होत असल्यानं भारतीय जनतेचा मोठा पाठिंबा संघाला मिळेल. आमच्या खेळाडूंसाठी ही एक चांगली बाजू असेल. मग इतर संघांचा विचार करता, मी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तानबद्दल बोलू शकत नाही, परंतु ते देखील चांगले खेळत आहेत. विश्वचषकापूर्वी आपल्या देशानं आशिया कपमध्ये आपलं कौशल्य दाखवलं आहे. आपली टीम सर्वच बाबतीत परिपूर्ण असल्याचं लाड यांनी म्हटलं आहे. रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर यांनी विश्वचषक जिंकण्यात सर्वात मोठी भूमिका बजावावी असं देखील लाड म्हणाले.

गोलंदाज बनला फलंदाज : कर्णधार रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर यांची आठवण सांगताना लाड म्हणाले की, रोहितनं क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली होती, पण मी त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं. आता रोहितची फलंदाजी बहरली आहे, हे तुम्ही सर्वजण पाहत आहात. शार्दुल ठाकरनं गोलंदाजीसोबतच डावखुऱ्या फिरकीपटूलाही सहा षटकार ठोकले असं लाड यांनी सांगितलं.

वाईड बॉलसाठी सर्वात घातक फलंदाज : रोहित शर्मा प्रत्येक सामन्यात विकेटवर जास्त वेळ घालवतो. रोहितनं गेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग पाच शतकं झळकावली होती. त्यावेळी फलंदाजी करताना तो संयमी होता. त्याचप्रमाणे जर रोहित जास्त वेळ सेट झाला, तर गोलंदाजाला रोहितला बाद करणं खूप कठीण जाईल. रोहित स्वत:हून बाद होऊ शकतो, मात्र गोलंदाजासाठी त्याला बाद करणं फार कठीण असतं. तसंच रोहित शर्मा वाइड बॉलसाठी सर्वात धोकादायक फलंदाज असल्याचं लाड यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : भारतीय संघात विश्वकप जिंकण्याची क्षमता - चंचल भट्टाचार्य
  2. Cricket World Cup 2023 : अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर अश्विनला संघात कशी मिळाली संधी?
  3. Cricket World Cup 2023 : विश्वचषकात कोणत्या संघाचं पारडं जड? कोणता खेळाडू ठरू शकतो 'ट्रम्प कार्ड'? जाणून घ्या प्रत्येक संघाबद्दल सविस्तरपणे

ABOUT THE AUTHOR

...view details